Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अखेर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हे नक्की मानले जात आहे. आज दुपारी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या एक तासांच्या चर्चेनंतर विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि दिवंगत अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेल्या किरण गुजर यांनी याबाबत दिली आहे.
पार्थ पवार शरद पवार भेट ठरली निर्णायक (Sharad Pawar)
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी बाबत मला कोणतीही माहिती नाही असं सांगून शरद पवारांनी सकाळी खळबळ उडवून दिली. शरद पवारांना अंधारात ठेवून सुनेत्रा पवारांचा शपथविधी उरकण्याचा प्लॅन तर सुरू नाही ना? अशा चर्चा यानिमित्ताने सुरू झाल्या. यानंतर दुपारी पार्थ पवार यांनी तातडीने बारामती मध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान परत पवार आणि शरद पवार यांच्या तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेतच सगळा गेम फिरला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग आला.
किरण गुजर यांची माहिती
विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि दिवंगत अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेल्या किरण गुजर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शपथविधीबाबत पवार कुटुंबात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यात आले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात, हे अजितदादांचं स्वप्नं होतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे, तसंच सहयोग सोसायटी इथं मी पार्थ पवार यांच्यासोबत स्वतंत्र चर्चा केली असून त्यांनीही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतचीच भूमिका मांडली, असं किरण गुजर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या एकत्र दिसू शकतात.





