Budget 2026 : अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा!!! निर्मला सीतारामन यांनी खजिना उघडला

Published:
कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Budget 2026 : अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा!!! निर्मला सीतारामन यांनी खजिना उघडला

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करत देशवासियांना दिलासा दिला. आत्मनिर्भर भारत हेच सरकारचे मुख्य लक्ष्य असून, आयात कमी करून निर्यात वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करेल, असे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिले.

आर्थिक विकासाला गती

कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्याची घोषणा करत, फार्मा क्षेत्रासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. भारत जागतिक पातळीवर बायोफार्मा शक्ती बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आर्थिक विकासाला गती देतानाच गरीब कल्याणावर सरकारचा अधिक फोकस राहील, असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. Budget 2026

निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख घोषणा (Budget 2026)

• कॅन्सर आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त होणार

• फार्मा क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद

• सरकारकडून तीन केमिकल पार्क उभारले जाणार

• जागतिक दर्जाचा औषध नियामक स्थापन केला जाणार

• आंध्र प्रदेश, ओडिसा आणि केरळमध्ये खनिज कॉरिडॉर

• इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स उत्पादनासाठी 40,000 कोटींचा प्रस्ताव

• गरीब कल्याण योजनांवर अधिक भर

• भारताला औषध निर्मितीचे जागतिक हब बनवण्याचे लक्ष्य

• पायाभूत सुविधा, MSME आणि उद्योगांना चालना

• दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर उभारणार

• वाराणसी आणि पटनामध्ये जहाज केंद्रांची उभारणी

• वस्त्रोद्योग कौशल्यविकासासाठी ‘समर्थ 2.0’

• आव्हानात्मक भागात मेगा टेक्सटाइल पार्क उभारणार

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews