Budget 2026 : काय स्वस्त, काय महाग?? एका Click वर जाणून घ्या

Published:
आजपासून देशात तंबाखूजन्य पदार्थ महाग झाले आहेत. तंबाखू, सिगारेट आणि पान मसाल्यावर अतिरिक्त कर (एक्साइज ड्युटी) आकारण्यात येत आहे. पान मसाल्यावर आरोग्य उपकरही लागू करण्यात आला आहे
Budget 2026 : काय स्वस्त, काय महाग?? एका Click वर जाणून घ्या

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी दिलासादायक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या महाग होणार, याकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

या अर्थसंकल्पात विविध वस्तूंवरील सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी करण्यात आली असून काही क्षेत्रांना अतिरिक्त सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ महाग झाल्याने व्यसनी लोकांना केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे, असे म्हणावे लागेल. Budget 2026

या वस्तू स्वस्त होणार

• परदेशी प्रवास
• बूट
• कपड्यांची निर्यात
• बीडी
• CNG
• बायोगॅस
• बॅटरी
• मच्छिमारांसाठी निर्यात सुलभ व स्वस्त
• 7 गंभीर आजारांवरील औषधे
• चामड्याची निर्यात
• ओवन आणि संबंधित उपकरणे
• मधुमेहावरील औषधे

या वस्तू महाग होणार

सिगारेट
• दारू
• खनिजे
• स्क्रॅप

सिगारेट आणि पान मसाल्यावर मोठा कर

आजपासून देशात तंबाखूजन्य पदार्थ महाग झाले आहेत. तंबाखू, सिगारेट आणि पान मसाल्यावर अतिरिक्त कर (एक्साइज ड्युटी) आकारण्यात येत आहे. पान मसाल्यावर आरोग्य उपकरही लागू करण्यात आला आहे. यामुळे सध्याचा 28 टक्के जीएसटी दर वाढून 40 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. सरकारने याबाबतची घोषणा गेल्या वर्षी दिवाळीपूर्वीच केली होती. त्यानुसार आजपासून सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्यावर अतिरिक्त 40 टक्के कर लागू झाला आहे.