Budget 2026: कंटेंट क्रिएटर्ससाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, गेमिंगमध्ये उपलब्ध होणार १० लाख नोकऱ्या

Published:
बजेट जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत भारताचे AVGC क्षेत्र वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे.
Budget 2026: कंटेंट क्रिएटर्ससाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, गेमिंगमध्ये उपलब्ध होणार १० लाख नोकऱ्या

Budget 2026 Marathi News:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रांबाबत विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. डिजिटल जगात यामध्ये कंटेंट क्रिएटर्ससाठीसुद्धा एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स क्षेत्राला बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

कंटेंट क्रिएटर्ससाठी नवी योजना-
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने देशभरात कंटेंट क्रिएटर्ससाठी आधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आजकालच्या युवा पिढीला नवीन तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून भारत जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेत एक मजबूत स्थान निर्माण करू शकेल.

बजेट जाहीर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत भारताचे AVGC क्षेत्र वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. २०३० पर्यंत या क्षेत्रात अंदाजे २० लाख व्यावसायिकांची आवश्यकता असेल असा अंदाज आहे. या गरजेला प्रतिसाद म्हणून, सरकारने कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंटेंट क्रिएटर लॅब्स-
अर्थमंत्राच्या मते, कंटेंट क्रिएटर लॅब्स तरुणांना व्यावहारिक ज्ञान देण्यास मदत करतील. ज्यामुळे त्यांना नवीन रोजगाराच्या संधी शोधणे सोपे होईल. अर्थसंकल्पीय प्रस्तावानुसार, देशभरातील १५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन केल्या जातील. या लॅब्समध्ये अ‍ॅनिमेशन, व्हिडिओ निर्मिती, गेम डिझाइन आणि डिजिटल स्टोरीटेलिंग यासारखी कौशल्ये शिकवली जातील.