ICICI Credit Card वापरकर्त्यांना मोठा धक्का! 1 फेब्रुवारीपासून या सवलती बंद

Published:
ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, १ फेब्रुवारी २०२६ पासून ICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल लागू करणार आहे. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार असून, अनेक लोकप्रिय सवलती बंद होणार आहेत,
ICICI Credit Card वापरकर्त्यांना मोठा धक्का! 1 फेब्रुवारीपासून या सवलती बंद

ICICI Credit Card : ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आजची ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, १ फेब्रुवारी २०२६ पासून ICICI बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल लागू करणार आहे. या बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार असून, अनेक लोकप्रिय सवलती बंद होणार आहेत, तर काही व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.

सर्वात आधी बोलूया चित्रपटप्रेमींसाठी वाईट बातमीची (ICICI Credit Card)

ICICI बँकेच्या इन्स्टंट प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड आणि इन्स्टंट प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर BookMyShow द्वारे मिळणारा मोफत किंवा सवलतीचा चित्रपट तिकीट लाभ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारीपासून या कार्डांवर कोणताही फ्री मूव्ही बेनिफिट मिळणार नाही. तरुण आणि शहरी ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली ही सुविधा आता इतिहासजमा होणार आहे.  ICICI Credit Card

मात्र, HPCL Super Saver Credit Card वापरणाऱ्यांसाठी थोडा दिलासा आहे. या कार्डधारकांना विमा हप्त्यांच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळत राहणार आहेत. परंतु, यासाठी कमाल मर्यादा ४० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कार्डच्या प्रकारानुसार वाहतूक व्यापारी श्रेणीतील १० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावरच रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत.

आता येऊया डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या बदलांकडे.

१५ जानेवारी २०२६ पासून ड्रीम११, MPL, Junglee Games, Rummy Culture यांसारख्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या व्यवहारांवर थेट २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. इतकंच नाही तर, Amazon Pay, Paytm आणि Mobikwik यांसारख्या थर्ड-पार्टी वॉलेटमध्ये जर ५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम लोड केली, तर त्यावर १ टक्का शुल्क द्यावं लागणार आहे. एकूणच, ICICI बँकेच्या या नव्या नियमांमुळे सवलती कमी आणि खर्च अधिक होण्याची शक्यता आहे.