सुनील तटकरेंचं नाव घेत अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!! म्हणाले की विलीनीकरणाबत …

Published:
अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 12 ते 13 बैठका झाल्या होत्या. जयंत पाटलांच्या घरी झालेली शेवटची बैठक रात्री 10 वाजता सुरू होऊन पहाटे 3 वाजेपर्यंत चालली. या बैठकीला 8 ते 10 जण उपस्थित होते.
सुनील तटकरेंचं नाव घेत अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!! म्हणाले की विलीनीकरणाबत …

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात अशी अजित पवारांची इच्छा होती असं म्हणत शरद पवारांच्या गट विलीनीकरणाबाबत सकारात्मक आहे तर दुसरीकडे अजितदादा गटातील प्रमुख नेते मात्र विलिनीकरणाच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे.  विलीनीकरणाबाबत आम्हाला दादांनी कोणती माहिती दिलीच नव्हती असं म्हणत या नेत्यांनी हात वर केलेत. मात्र आता माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट सुनील तटकरे यांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख

अजितदादांची शेवटची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत अशीच होती. शरद पवार साहेबांचे वय लक्षात घेता त्यांना मानसिक त्रास होऊ नये, हीच अजितदादांची भावना होती, असेही देशमुख म्हणाले. अजितदादांची ही इच्छा पूर्ण करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. तसेच अजितदादांची शेवटची भेट बाबा आढावांच्या अंत्यविधीच्या वेळी झाली होती, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

किती बैठका झाल्या

अनिल देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 12 ते 13 बैठका झाल्या होत्या. जयंत पाटलांच्या घरी झालेली शेवटची बैठक रात्री 10 वाजता सुरू होऊन पहाटे 3 वाजेपर्यंत चालली. या बैठकीला 8 ते 10 जण उपस्थित होते. यानंतर अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात स्वतंत्र बैठकही झाली असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. “काय करायचं, कसं करायचं आणि कुठे करायचं हे सर्व ठरलं होतं. 12 तारखेची तारीखही निश्चित झाली होती,” असे त्यांनी सांगितले.