Politics News : राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही; राज ठाकरेंच्या ट्विटने वातावरण तापलं

Published:
अजित पवारांच्या निधनाला अवघे तीनच दिवस झाले आहेत मात्र तरीही पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. या सर्व घडामोडीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे ही चौकडी आघाडीवर होती
Politics News : राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही; राज ठाकरेंच्या ट्विटने वातावरण तापलं

Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनाला अवघे तीनच दिवस झाले आहेत मात्र तरीही पक्षात अंतर्गत घडामोडींना वेग आला आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आले. या सर्व घडामोडीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे ही चौकडी आघाडीवर होती. प्रफुल पटेल यांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्याची घाई तर झाली नाही ना अशा चर्चाही सोशल मीडियात पसरू लागल्या. यास पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट चर्चेत आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही असू ट्विट करत राज ठाकरेंनी राजकीय वातावरण तापवलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे? Politics News

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !’ असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. Politics News

प्रफुल्ल पटेल अध्यक्ष होणार का

दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना एकदमच प्रेक लागला आहे. दादा गटातील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी त्यांना विलीनीकरण मान्य नाही अशाही चर्चा माध्यमात सुरू होत्या. सध्या सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेते पदी निवड झाली आहे. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणूनही त्या विराजमान झाले आहेत . परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा पेच अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.