11 जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला पुनरागमनासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून त्याला सध्या खेळण्याची परवानगी मिळालेली नाही.