शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते. शनिवार हा शनिदेव आणि हनुमानाच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. या दिवशी पूर्ण भक्तीने पूजा केली तर शनिदेवाच्या कृपेने जीवनातील सर्व दुःखे, अडचणी आणि त्रास दूर होऊ शकतात. शनिवार निमित्त आपण शनिदेवाच्या विशेष शक्तिशाली नावांबद्दल जाणून घेऊयात…
शनिदेव म्हणजे कोण?
शनिदेव हे न्यायदेवता असून, ते कर्माचा हिशोब ठेवतात; चांगले काम करणाऱ्यांना फळ देतात व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा देतात. सूर्यदेव आणि छाया यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आहे, ते सूर्यदेवांचे पुत्र आहेत, असे मानले जाते.
शनिदेवांच्या नावांचे महत्त्व
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनिदेवांच्या नावांचा जप करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे शनिदोष कमी होऊन संकट दूर होतात आणि मानसिक शांती व यश मिळते. यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावून किंवा मंदिरात १०८ वेळा हा जप केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते, असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.
शनिदेवांची नावे
- कोणस्थ – हे नाव शनिदेवांची शक्ती दर्शवते.
- पिंगल – हे नाव त्यांच्या सौम्य स्वरूपाचे प्रतीक आहे.
- बभ्रू – याचा अर्थ तप आणि भक्तीचे स्वरूप आहे.
- कृष्ण – हे नाव शनिदेवांचा गडद रंग आणि तेज दर्शवितो.
-
रौद्रांतक – त्याच्या उग्र आणि न्यायप्रेमी स्वभावाचे सूचक आहे.
-
यम – कारण शनिदेव यमराजाचा भाऊ आहे.
-
सौरी – हे नाव त्याला सूर्यदेवाचा पुत्र असल्याचे दर्शवते.
-
शनिश्चर – त्याच्या मंद गतीशील स्वभावाचे सूचक आहे.
-
मंद – हे नाव त्याच्या शांत आणि स्थिर स्वभावाचे सूचक आहे.
-
शनि – त्याचे मूळ नाव, जे प्रत्येक संकटाचा अंत मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





