हिंदू परंपरांमध्ये केरसुणी देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. केरसुणीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळेच केरसुणी घराच्या सुख-समृद्धीचं प्रतीक मानली जाते. पण तुम्ही चुकीच्या दिवशी केरसुणी खरेदी केल्यास कुटुंबाचं आर्थिक नुकसान होतं. याबद्दल जाणून घेऊयात…
केरसुणी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस
वास्तुशास्त्रानुसार नवीन झाडू खरेदी करण्यासाठी काही शुभ दिवस असतात. केरसुणी खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. यादिवशी केरसुणी खरेदी करून घरी आणल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकजूट वाढते. शनिवार नवीन झाडू आणण्यासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
या दिवशी केरसुणी खरेदी करणं टाळा
मंगळवार, रविवार आणि बुधवार या दिवशी झाडू खरेदी करणे टाळावे, कारण ते अशुभ मानले जाते. मंगळवार या दिवशी झाडू खरेदी केल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील कामांमध्ये अडथळे येतात. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असल्याने, या दिवशी नवीन झाडू आणणे टाळावे. या दिवशी झाडू खरेदी केल्यास घरात दारिद्र्य येते, आर्थिक नुकसान होते, असे वास्तुशास्त्र सांगते, म्हणून हे दिवस टाळावेत. विशेषतः बुधवारी झाडू खरेदी करू नये.
केरसुणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून तिची खरेदी आणि वापर करताना वास्तुशास्त्रातील नियमांचे पालन केल्यास घरात धन आणि शांती नांदते, असे मानले जाते.
महत्त्वाचे नियम
- नवीन झाडू आणल्यावर लगेच जुना फेकू नका. नवीन झाडूने थोडे झाडून घ्या आणि मग जुना झाडू बदला.
- झाडू घराच्या दक्षिण, नैऋत्य, पश्चिम किंवा वायव्य कोपऱ्यात आडवा ठेवावा.
- तुटलेला किंवा खराब झालेला झाडू वापरू नये, तो लगेच बदला.
- घरात एकावेळी दोनपेक्षा जास्त झाडू ठेवू नयेत.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





