Mon, Dec 29, 2025

31st Night Party : 31st ला धिंगाणा घालणार? मग नववर्षाची सुरुवात जेलमधूनच होईल

Published:
थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ग्रस्त वाढवली आहे. ड्रग ची तस्करी करणाऱ्यांसह सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
31st Night Party : 31st ला धिंगाणा घालणार? मग नववर्षाची सुरुवात जेलमधूनच होईल

31st Night Party : 2025 हे वर्ष संपत आला असून सर्वांच लक्ष २०२६ या नवीन वर्षाकडे आहे. अनेक जणू वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्याच्या चालू वर्षाला चांगल्या प्रकारे सेंड ऑफ देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री जंगी पार्टी करण्यात येते. बार, हॉटेल, पब या ठिकाणी तोबा गर्दी होते. अनेक जण 31 डिसेंबरच्या चल्लोषात ड्रग्स, दारू, सिगरेट याचे सेवन करतात. साहजिकच नशेत असलेल्या तरुणांकडून 31 डिसेंबर रोजी धिंगाणा घालण्याच्या घटनाही आपण वर्षानुवर्षी बघत आलोय. आता मात्र मुंबई पोलीस सतर्क झाली असून धिंगाणा घालणाऱ्या लोकांना थेट तुरुंगात टाकण्यात येणार आहे.

थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ग्रस्त वाढवली आहे. ड्रग ची तस्करी करणाऱ्यांसह सेवन करणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. यासाठी ऑनलाइन बुकिंग साईटवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.

बार – रेस्टॉरंट वर करडी नजर (31st Night Party)

मुंबईतील दादर, वरळी, गोरेगाव, कुलाबा, जुहू, अंधेरी, सांताक्रुज, वांद्रे यांसारख्या उच्चभ्र वस्तीमधील हॉटेल, रेस्टॉरंट , पब 31 डिसेंबरच्या रात्री नाइट पार्टीचे आयोजन करतात. यासाठी अमली पदार्थ विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड, आणि रेव पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी इव्हेंट ऑर्गनायझर साइट्स आणि सोशल मीडियावर पोलिसांची नजर आहे. 31st Night Party

धिंगाणा घालण्याची सवय

थर्टी फर्स्टच्या नावाखाली अनेक जण दारू पिऊन धिंगाणा घालतात.  दारूच्या नशेत कशाही गाड्या चालवतात. महिलांची छेडछाड करतात . रस्त्यांवर विनाकारण गोंधळही घातला जातो. अशा मद्यपींवर  पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री धिंगाणा घालाल तर नवीन वर्षात जेलमध्ये जावं लागेल असा इशाराच पोलिसांकडून देण्यात आलाय.