Sun, Dec 28, 2025

BSNL Recharge Plans : नववर्षात BSNL चा खास रिचार्ज प्लॅन!! दररोज 3 GB इंटरनेट

Published:
देशी टेलिकॉम कंपनी BSNL ने मागच्या काही वर्षात चांगलीच आघाडी घेतली आहे. देशातील अनेक भागात बीएसएनएलने चांगल्या प्रकारे नेटवर्क पकडले असून आजही अनेक प्रमुख शहरात बीएसएनएल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
BSNL Recharge Plans : नववर्षात BSNL चा खास रिचार्ज प्लॅन!! दररोज 3 GB इंटरनेट

BSNL Recharge Plans : देशी टेलिकॉम कंपनी BSNL ने मागच्या काही वर्षात चांगलीच आघाडी घेतली आहे. देशातील अनेक भागात बीएसएनएलने चांगल्या प्रकारे नेटवर्क पकडले असून आजही अनेक प्रमुख शहरात बीएसएनएल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागचं कारण म्हणजे एअरटेल, जिओ वोडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त आणि सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे असेच असतात. आता नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक खास रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे . या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज3 GB इंटरनेटचा लाभ घेता येतोय.

किती रुपयांचा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plans)

ज्या रिचार्ज प्लॅन बाबत आम्ही तुम्हाला सांगतोय तो आहे बीएसएनएलचा 2799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन. या प्लॅनच्या माध्यमातून दररोज तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस ची सुविधा मिळतेय. महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला दररोज तब्बल 3 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ घेता येईल. इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेट उपलब्ध असल्याने तुम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. BSNL Recharge Plans

365 दिवसांची वैधता

आणखी एक खास बाब म्हणजे बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलेडीटीसह उपलब्ध आहे. म्हणजेच काय तर एकदा रिचार्ज केल्यानंतर वर्षभर तुम्हाला रिचार्ज करावा लागणार नाही. एकूण जर पैशाचा हिशोब केला तर 365 दिवसांच्या वैधतेनुसार तुम्हाला या प्लॅन साठी दररोजचा खर्च फक्त 7.67 रुपये इतका पडतोय. इतर टेलिकॉम कंपनीच्या तुलनेने बीएसएनएल चा हा रिचार्ज प्लॅन खूपच परवडणार आहे. कारण रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन ज्याची वैधता 365 दिवसांची आहे, त्याची किंमत 3,599 रुपये आहे. याचा अर्थ बीएसएनएलपेक्षा अंदाजे 800 रूपयांनी तो महाग आहे.