Wed, Dec 31, 2025

Vastu Shastra : आपण गणपतीची मू्र्ती भेट म्हणून देऊ शकतो का ? जाणून घ्या…

Published:
गणपती ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक असल्याने, काहीवेळा त्याची मूर्ती भेट दिल्याने आपल्यातील ज्ञान कमी होऊ शकते, अशी प्रतीकात्मक भीती व्यक्त केली जाते, म्हणून विचारपूर्वक द्यावी.
Vastu Shastra : आपण गणपतीची मू्र्ती भेट म्हणून देऊ शकतो का ? जाणून घ्या…

वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू भेट म्हणून मिळणे खूप शुभ मानले जाते. या गोष्टी माणसाच्या आयुष्यात सकारात्मक उर्जा घेऊन येतात, त्यामुळे त्या व्यक्तीचं नशीब बदलतं. हिंदू धर्मात श्री गणेश देवांच्या पूजेचे विशेष महत्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यक्रम असो किंवा कोणत्याही देवाच्या पूजेआधी गणपतीची पूजा केली जाते. आज आपण गणेश मूर्ती कोणाला भेट म्हणून द्यावी की नाही ? याबद्दल जाणून घेणार आहोत…

गणपतीची मूर्ती कोणाला भेट म्हणून द्यावी की नाही ?

वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती स्वतःसाठी खरेदी करणे शुभ असले तरी, ती भेट देणे टाळावे कारण त्यामुळे तुमची सुख-समृद्धी दुसऱ्याला जात असल्याचे मानले जाते.  वास्तुशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक असते, जी भेट दिल्याने तुम्ही ती दुसऱ्याला देत आहात, असे मानले जाते. मूर्ती घरातून बाहेर गेल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते.

तरीही गणपतीची मूर्ती गिफ्ट द्यायची असल्यास ‘या’ गोष्टींची काळजी घ्या 

योग्य मूर्तीची निवड : बसलेल्या गणपतीची मूर्ती शांतता आणि सुसंवाद दर्शवते, जी भेट देण्यासाठी चांगली असू शकते. तर, नाचणाऱ्या किंवा झोपलेल्या गणपतीची मूर्ती वैभवासाठी असते, पण ती स्वतःसाठी ठेवणे चांगले मानतात.

योग्य प्रसंग : गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन कामाची सुरुवात यांसारख्या शुभ प्रसंगी भेट देणे योग्य मानले जाते, परंतु वाढदिवसाला किंवा सामान्य भेटीत देणे टाळावे.

सोंडेची दिशा : डावीकडे सोंड असलेली मूर्ती घरात शांतता आणते, तर उजवीकडे सोंड असलेली मूर्ती अधिक ऊर्जावान असते आणि ती घरात ठेवताना विशेष नियम पाळावे लागतात. त्यामुळे, भेट देताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती निवडावी.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)