Remedies to overcome iron deficiency: आजकाल चुकीच्या आहारामुळे आणि बदलेल्या लाइफस्टाइलमुळे प्रौढ आणि मुलांमध्ये लोहाची कमतरता होत आहे. लोहाच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
या कमतरतेवर मात करण्यासाठी, लोक त्यांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करतात. जे लोहाची पातळी वाढवण्यास मदत करतात. परंतु, जर तुम्हाला तुमच्या शरीरात लोहाची पातळी नैसर्गिकरित्या वाढवायची असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक या आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता…..
सुंठ-
लोहाची कमतरता दूर करण्यासाठी तुमच्या आहारात दररोज सुंठचा समावेश करा. तुम्ही ते जेवण, चहा किंवा सूपमध्ये घालून खाऊ शकता. सुंठ तुमच्या पचनाला मदत करते आणि पचनक्रिया संतुलित करून लोहासह पोषक तत्वांचे शोषण सुधारते.त्यामुळे लोहाची कमतरता दूर होते.
तूप आणि आवळा पावडर-
रोज जेवणापूर्वी तुमच्या आहारात देशी तुपासोबत १ चमचा आवळा पावडरचा समावेश करा. आवळा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. जो लोहाचे शोषण वाढवतो, तर तूप पचन सुधारून आरोग्य चांगले ठेवते.
काळे मनुके आणि द्राक्षे-
लोहाची कमतरता दूर करण्यासाठी, तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात भिजवलेले काळे मनुके आणि काळी द्राक्षे समाविष्ट करू शकता. दोन्ही पदार्थ लोहाचे चांगले स्रोत मानले जातात, जे रक्त निर्मितीस मदत करतात आणि उर्जेची पातळी वाढवतात.
उष्णता वाढवणारे पदार्थ टाळा-
शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ, म्हणजेच पित्त आणि आम्लवाढवणारे पदार्थ टाळा. तुमच्यात लोहाची कमतरता असेल, तर ऍपल सायडर व्हिनेगर, टोमॅटो, बटाटे आणि कॉफी यांसारखे पदार्थ टाळा किंवा मर्यादित करा. या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने पचनक्रियेस त्रास होऊ शकतो आणि पित्ताचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीराला लोह योग्यरित्या शोषणे कठीण होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





