Wed, Dec 31, 2025

तुम्ही कधी केलंय का आयब्रो मसाज? फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Published:
अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल, परंतु आयब्रो मसाज केल्याने अनेक फायदे मिळतात.
तुम्ही कधी केलंय का आयब्रो मसाज? फायदे जाणून वाटेल आश्चर्य

Benefits of Eyebrow Massage:   आजकाल नवनवीन ब्युटी ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड्स खूप लवकर बदलतात. बऱ्याचदा हे ट्रेंड्स फायदेशीर देखील असतात. असाच एक व्हायरल ट्रेंड म्हणजे आयब्रो मसाज होय. ज्यांच्या भुवया विरळ आहेत त्यांच्यासाठी हा मसाज फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहितेय का त्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण आयब्रोला मसाज करण्याच्या विविध फायद्यांबाबत जाणून घेऊया….

दाट आणि उठावदार भुवया-
काही लोकांच्या भुवयांची वाढ खूपच कमी असते. अशावेळी तज्ज्ञ भुवयांना मालिश करण्याची शिफारस करतात. मालिश केल्याने भुवयांच्या केसांची वाढ होते. यामुळे त्वचेची लवचिकता आणि रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होण्यास मदत होते.

डोळ्यांची सूज कमी होते-
भुवयांना मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह वाढतो. यामुळे डोळ्यांचा फुगीरपणा कमी होतो. या मालिशमुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील कमी होतात. जास्तीत जास्त फायद्यांसाठी, भुवयांपासून डोळ्यांखालील भागापर्यंत मालिश करावी.

चेहरा चमकदार बनतो-
भुवयांच्या मालिशमुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो. यामुळे काळी वर्तुळे आणि सूज कमी होते. यामुळे चेहऱ्यावरील स्नायूंना आराम मिळतो. या मालिशमुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होते. चेहऱ्यावर चमक येते.

डार्क सर्कल कमी होतात-
आजकाल डार्क सर्कल ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येसाठी भुवयांचा मसाज देखील फायदेशीर आहे. डोळ्यांखालील भागाची मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे नवीन त्वचेच्या पेशी निर्माण होण्यास मदत होते आणि काळी वर्तुळे हळूहळू कमी होतात. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.

तणाव कमी होतो-
भुवयांच्या मालिशमुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमचे स्नायू रिलॅक्स होतात आणि ताण कमी होतो. जर तुम्हाला डोळे किंवा डोके दुखत असेल तर थोड्या वेळासाठी मालिश केल्याने आराम मिळू शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)