What to mix in bathwater to feel refreshed: आजकाल धावपळीच्या जगात सतत ताणतणाव येत असतो. ऑफिस, करिअर, रिलेशनशिप अशा विविध कारणांमुळे सतत तणाव जाणवत असतो. अशावेळी आराम करण्यासाठी आंघोळ करण्यापेक्षा उत्तम काही नाही. तुमच्या शरीराला आराम देण्यासाठी, तुम्ही झोपण्यापूर्वीही आंघोळ करू शकता.
पाण्यात काही पदार्थ मिसळल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आराम मिळेल. जर तुम्हाला त्वचेची कोणतीही समस्या असेल, तर याचा वापर केल्याने मदत होऊ शकते. आज मन आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात काय घालावे ते जाणून घेऊया…..
गुलाबजल-
दिवसभरातील घामाच्या वासापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पाण्यात गुलाबजल घालू शकता. यामुळे तुमच्या शरीराला चांगला वास येईल. या पाण्याने आंघोळ केल्याने थकवा कमी होईल आणि ताण कमी होईल. यासाठी ५ ते ६ गुलाबाची फुले पाण्यात उकळा. हे पाणी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात घाला आणि गुलाबाच्या पाकळ्या घाला. सकाळी लवकर या पाण्याने आंघोळ केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल.
हळद-
ताणतणाव दूर करण्यासाठी तुम्ही पाण्यात हळद मिसळून आंघोळ करू शकता. यामुळे त्वचेचे संक्रमण कमी होण्यासही मदत होते. जर तुमच्या शरीरावर खाज सुटली असेल किंवा संसर्ग झाला असेल तर हळदीच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरेल. शिवाय थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत होईल.
तुळस आणि कडुलिंब-
तुळस आणि कडुलिंब दोन्ही शरीरासाठी फायदेशीर आहेत. त्यांच्यात अँटी इन्फ्लीमेंट्री आणि, अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल गुणधर्म आहेत. या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेचे संक्रमण कमी होईल. जर तुम्हाला अंगावर पित्ताच्या गाठी, उष्णतेने पुरळचा त्रास होत असेल तर यामुळे आराम मिळेल.
पुदिन्याचे तेल-
जर तुम्हाला तुमच्या शरीरावर खाज आणि जळजळ होत असेल तर तुम्ही पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून आंघोळ करू शकता. यामुळे तुमचे शरीर आणि मन रिलॅक्स होईल. पुदिन्याच्या तेलाने थंडावा मिळतो त्यामुळे तणावही दूर होतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





