Wed, Dec 31, 2025

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ ३ उपाय, आजपासून करा ट्राय

Published:
वयानुसार बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसणे सामान्य असले तरी त्यावर काही घरगुती उपाय करता येतात.
कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ ३ उपाय, आजपासून करा ट्राय

Home remedies to reduce forehead wrinkles:  आजकाल सुंदर, टवटवीत आणि तरुण दिसण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही सलूनमध्ये विविध महागड्या ट्रीटमेंट घेतात. परंतु या उपचारांचा अनेकदा हवा तसा फायदा मिळत नाही. याउलट वापरल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये विविध रसायने असतात, जी जास्त प्रमाणात वापरली तर त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे कपाळावर बारीक रेषा येणे किंवा सुरकूत्या येणे होय.

वयानुसार बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसणे सामान्य असले तरी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त सूर्यप्रकाश आणि तणाव हे लहान वयात चेहऱ्यावर-कपाळावर सुरकुत्या दिसण्यास कारणीभूत ठरत आहेत. म्हणूनच, आज आपण कपाळावरील सुरकुत्या कमी करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊया……

चेहऱ्याचा मसाज-
कपाळावरील बारीक रेषा कमी करण्यासाठी चेहऱ्याचा मसाज हा एक चांगला आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. यासाठी तुम्ही तुमचे आवडते फेस ऑइल वापरू शकता. तुमच्या बोटांना फेस ऑइल लावा आणि प्रथम खालून वर गोलाकार हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटांनंतर, तुमच्या बोटांना कपाळाच्या मध्यभागी ठेवा आणि नंतर कानाकडे मसाज करा. मसाज केल्याने त्वचेत रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे स्नायूंना पोषण मिळते आणि बारीक रेषासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

गाजर आणि काकडीचा रस-
आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लहान वयातच कपाळावर बारीक रेषा येऊ लागतात. जर तुमच्या शरीराला आवश्यक पोषण मिळाले नाही तर ते तुमच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम करते, ज्यामुळे बारीक रेषा निर्माण होतात. म्हणून, तुमच्या कपाळावरील बारीक रेषा कमी करण्यासाठी, तुमच्या दैनंदिन आहारात काकडी किंवा गाजराचा रस समाविष्ट करा. गाजर आणि काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात. जे त्वचा निरोगी आणि तरुण ठेवतात.

दही आणि मध-
कपाळावरील बारीक रेषा कमी करण्यासाठी दही आणि मधापासून बनवलेला मास्क फायदेशीर ठरू शकतो. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. ते त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे बारीक रेषा कमी होतात. मधात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. जे निरोगी त्वचेसाठी मदत देतात. यासाठी, अर्धा चमचा मध दोन चमचे दह्यात मिसळून फेस मास्क तयार करा आणि तुमच्या कपाळावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनंतर,चेहरा पाण्याने धुवा. काही दिवसांतच फरक दिसेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)