Wed, Dec 31, 2025

Vastu Shastra : रात्री झाडांची पानं-फुलं तोडू नये ? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

Published:
आजही घरातील वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळी झाडांना हात लावायला किंवा त्यांची फुले आणि पाने तोडायला नकार देतात. यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर वैज्ञानिक कारणेही सांगण्यात आली आहेत. याबद्दल जाणून घेऊयात..
Vastu Shastra : रात्री झाडांची पानं-फुलं तोडू नये ? जाणून घ्या यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात आणि वास्तूशास्त्रात संध्याकाळनंतर झाडांना स्पर्श करण्यास किंवा त्यांची पाने तोडण्यास मनाई आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री झाडांची पानं-फुलं तोडू नयेत कारण धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणं आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे

सजीव मानणे : हिंदू धर्मात झाडं-वनस्पतींना सजीव मानले जाते, जसे मनुष्य आणि प्राणी विश्रांती घेतात, तसेच संध्याकाळी झाडं विश्रांती घेतात, म्हणून त्यांना तोडणे अशुभ मानले जाते.

देवतांचा वास : तुळस आणि इतर पवित्र वनस्पतींमध्ये देवतांचा वास असतो, म्हणून सूर्यास्तानंतर त्यांना स्पर्श करणे निषिद्ध मानले जाते.

निसर्गाचा आदर : ही एक शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे, जी निसर्गाचा आदर आणि संतुलन राखण्यासाठी आहे, असे मानले जाते.

अपवित्रता : सूर्यास्तानंतर फुले कोमेजतात आणि त्यांचा सुगंध व सौंदर्य संपते. अशा फुलांनी पूजा केल्यास त्याचे फळ मिळत नाही, असे मानले जाते.

पर्यावरणाचे रक्षण : रात्री झाडांवर अनेक कीटक, पक्षी निवासासाठी परततात, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणूनही ही प्रथा आहे. 

वैज्ञानिक कारणे

कार्बन डायऑक्साइड : दिवसा झाडं कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन बाहेर टाकतात, पण रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश नसल्याने ती कार्बन डायऑक्साइड सोडतात. अशावेळी ती तोडल्यास नैसर्गिक क्रिया विस्कळीत होते आणि वातावरणातही CO2 वाढतो, असे काही शास्त्रज्ञ मानतात.

वनस्पतींचे आरोग्य : रात्री पाने किंवा फुले तोडल्याने झाडाला जखम होते, ज्यामुळे रोग किंवा किडींचा धोका वाढतो आणि झाडाच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. रात्रीच्या वेळी झाडांच्या पेशींची क्रिया मंदावते. अशा वेळी पाने किंवा फुले तोडल्यास झाडाच्या नैसर्गिक वाढीवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

सुरक्षितता : रात्रीच्या वेळी अंधारात अनेक विषारी कीटक किंवा प्राणी (उदा. उंदीर, विषारी किडे) झाडांच्या आजूबाजूला असू शकतात, त्यामुळे धोका टाळण्यासाठीही ही खबरदारी घेतली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)