Home remedies to reduce period pain: प्रत्येक महिलेसाठी, मासिक पाळी प्रचंड तणावपूर्वक आणि त्रासदायक असते. दर महिन्यातील काही दिवस हा त्रास सहन करावा लागतो. ज्या दरम्यान त्यांना तीव्र पोटदुखी आणि मूड स्विंगचा सामना करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना पिरियड क्रॅम्प म्हणून ओळखल्या जातात.
मासिक पाळीच्या वेदना प्रत्येक महिलेनुसार बदलतात. काही महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान थोड्याशा वेदना होतात, तर काहींना इतक्या वेदना होतात की त्यांना आराम मिळवण्यासाठी पेनकिलर घ्यावी लागतात. पण जर तुम्हाला मासिक पाळीच्या क्रॅम्प्सपासून नैसर्गिकरित्या आराम मिळवायचा असेल, तर काही सोप्या टिप्स फॉलो करा…..
तुप घालून पाणी पिणे-
मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना आणि गोळे कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात तूपाचे पाणी समाविष्ट करू शकता. तूपाचे पाणी पोटफुगी कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे मासिक पाळीच्या क्रॅम्प कमी होतात. तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान, एका ग्लास कोमट पाण्यात १ चमचा तूप मिसळा आणि ते दररोज प्या. असे केल्यास पोटदुखीपासून आराम मिळेल.
आले आणि ओव्याचे पाणी-
जर तुम्हाला तुपाचे पाणी पिणे आवडत नसेल, तर मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आले आणि ओव्याचे पाणीदेखील पिऊ शकता. आल्यामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात जे वेदना कमी करण्यास मदत करतात, तर ओवा पोटफुगी आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत करते.
पोटाची मालिश-
मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पोटाची मालिश करू शकता. पोटाची मालिश केल्याने गर्भाशयाच्या स्नायूंना आराम मिळतो. ज्यामुळे वेदना कमी होतात. तुमच्या नाभीच्या खाली तुमच्या पोटावर हलका दाब द्या. यामुळे लगेच आराम मिळेल.
नाभीला तेल लावणे-
मासिक पाळीच्या वेळी नाभीला तेल लावल्यानेही आराम मिळू शकतो. खोबरेल किंवा तिळाचे तेल गरम करून, नाभीला काही थेंब लावून हलक्या हाताने मालिश केल्याने तुमच्या गर्भाशयाला आराम मिळतो आणि पोटातील गोळे कमी होतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





