Wed, Dec 31, 2025

Vastu Tips : काळ्या मिरीचे ‘हे’ सोपे उपाय करा, शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Published:
आपल्या स्वयंपाकघरामधील मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवतात. यातील एक महत्त्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ही पदार्थाची चव वाढवण्यासोबत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाची आहे. 
Vastu Tips : काळ्या मिरीचे ‘हे’ सोपे उपाय करा, शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

वास्तुशास्त्रामध्ये आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या गोष्टींचे असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे आपण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो. यापैकी एक आहे काळी मिरी. काळी मिरी ही शनिदेवाशी संबंधित असल्याने वास्तुशास्त्रात याचे अनेक उपाय सांगितले आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

नजरदोष दूर करण्यासाठी

सात काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते डोक्यावरून फिरवून (नजर उतरवून) घरातच जाळा, यामुळे नजरदोष दूर होतो आणि घरात सुख-शांती येते. यामुळे वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते.

एका काळ्या कपड्यात ७ काळी मिरी, १ रुपयाचे नाणे आणि थोडे मीठ बांधून ते घरातल्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला टांगून ठेवा.

आर्थिक समस्यांसाठी

घरातून निघताना किंवा कामावर जाताना काळ्या मिरीचे काही दाणे जमिनीवर ठेवा आणि त्यावर पाय देऊन पुढे जा, यामुळे कामात यश मिळते आणि पैशांची आवक वाढते.

पाच काळ्या मिरीचे दाणे घेऊन ते डोक्यावरून फिरवा. चौरस्त्यावर किंवा निर्जन ठिकाणी चार दाणे चार दिशांना फेका आणि पाचवा दाणा आकाशात फेकून मागे न पाहता घरी या. यामुळे शनि दोषाचा प्रभाव कमी होऊन धनलाभ होतो, असे सांगितले जाते.

तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये काळ्या मिरीचे काही दाणे ठेवा. यामुळे पैसे टिकून राहतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात.

वास्तुदोष निवारणासाठी

घरातील प्रवेशद्वाराजवळ काळी मिरी ठेवल्यास वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. काळ्या मिरीच्या दाण्यांचा उपयोग करून आर्थिक अडचणी दूर करता येतात. हे उपाय केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि वास्तुदोषही दूर होतात, अशी श्रद्धा आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी, काळ्या मिरीचे काही दाणे जाळून त्याची धूर घरात फिरवा.

नोकरी/व्यवसायात प्रगतीसाठी

काळ्या मिरीचे काही दाणे आपल्या खिशात ठेवा किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि उत्पन्नात वाढ होते, असे मानले जाते.

शनिदोषासाठी

काळी मिरी शनिदेवाशी संबंधित असल्याने, काही उपायांद्वारे शनिदोषाचा प्रभाव कमी करता येतो. शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने रोगांपासून आराम मिळतो

शनिवारी ७ काळ्या मिरीचे दाणे घेऊन त्यांना आपल्या डोक्यावरून ७ वेळा फिरवून एका काळ्या कापडात बांधा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे शनिदेवाची कृपा मिळते व शनिदोषाचा प्रभाव कमी होतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)