पौष महिन्यात येणारी भागवत एकादशी घरात सुख-समृद्धी येण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन, चांगले आरोग्य आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. भागवत एकादशीचे महत्व काय आहे आणि या दिवशी व्रत व पूजा कशी करावी. याबद्दल जाणून घेऊयात…
भागवत एकादशी व्रताचं महत्त्व
भागवत एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून याला ‘पुत्रदा एकादशी’ असेही म्हणतात. भागवत एकादशीचे व्रत ज्या जोडप्यांना संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी हे व्रत वरदान मानले जाते. ज्यांना मुले आहेत, ते मुलांच्या सुखासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करतात. या व्रतामुळे धन-धान्य वाढते, आरोग्य चांगले राहते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, असे सांगितले जाते. हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते आणि सर्व पापदोषांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.
भागवत एकादशीच्या पूजेची पद्धत
- पहाटे लवकर उठून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा.
- देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा.
- विष्णूंना पिवळ्या फुलांची माळ, अक्षता, हळद-कुंकू, फुले, तुळस अर्पण करा.
- ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ किंवा विष्णू मंत्रांचा जप करा.
- फळे, मिठाई, दूध यांचा नैवेद्य दाखवा.
- दिवा लावा, धूप दाखवा आणि विष्णूंची आरती करा.
- भागवत एकादशीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका.
- दिवसभर फलाहार करून किंवा निर्जल राहून व्रत पाळा.
- दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) सकाळी स्नान करून, विष्णूंची पूजा करून, ब्राह्मण भोजन घालून व दानधर्म करून व्रताचे पारायण करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





