कालाष्टमी या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. ही पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होतात, घरात पैशाची आवक वाढते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.
कालाष्टमीचे महत्व
कालाष्टमी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी, जी भगवान शंकराचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे, या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, भय, रोग आणि अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते; यालाच आध्यात्मिक शुद्धीसाठी महत्त्वाचे मानले जाते. ही तिथी कालभैरवाची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते, जे शिवाचे उग्र रूप असून वेळ आणि मृत्यूचे स्वामी आहेत. या दिवशी पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती आणि जादू टोणा यांचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. जीवनातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी हे व्रत महत्त्वपूर्ण आहे.
पौराणिक कथा
एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या श्रेष्ठतेवरून वाद झाले. हा वाद वाढत गेल्याने सर्व देवतांची बैठक बोलवण्यात आली. सगळ्यांचा विचारण्यात आलं तिघांत श्रेष्ठ कोण आहे? प्रत्येकाने आपापले विचार व्यक्त केले आणि उत्तर शोधली. त्या गोष्टींचं समर्थन विष्णू आणि शंकराने तर केलं. पण ब्रह्मांनी शंकरांना काही अपशब्द बोलले. ब्रह्मदेवाने एकदा शिवाला अपमानित केले, तेव्हा भगवान शंकराच्या क्रोधातून महादेवाचे उग्र रूप ‘कालभैरव’ प्रकट झाले. शंकराने त्यावेळी आपल्या क्रोधातून कालभैरवाला जन्म दिला. या भैरव अवताराचं वाहन काळं कुत्र आहे. त्यांच्या एका हातात काठी आहे. या अवताराला महाकालेश्वर नावाने तसंच दंडाधिपती म्हणूनही ओळखलं जातं.
शंकराच्या या अवताराला बघून सगळे घाबरले. भैरवाने रागात येऊन ब्रह्मांच्या ५ मुखांपैकी एका मुखाला कापलं. तेव्हापासून ब्रह्मांना ४ मुख आहे. ब्रह्माचं एक मुख कापल्याने भैरवावर ब्रह्महत्येचे पाप लागले. ब्रह्माने भैरवाची माफी मागितली तेव्हा कुठे शंकर शांत होऊन आपल्या मूळ रुपात आले. भैरवाला त्याच्या पापांची शिक्षा म्हणून बराच काळ भिकाऱ्यासारखा घालवावा लागलै. अनेक वर्षानंतर वाराणसीत त्यांची शिक्षा संपली. म्हणून त्यांच एक नाव दंडपाणी आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





