MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

हिवाळ्यात सकाळी-सकाळी पोट साफ होत नाही? बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Published:
पोट साफ होण्यासाठी अनेकजण विविध प्रकारची औषधे आणि चूर्ण घेतात. परंतु त्याचा फायदा तेव्हढ्या पुरताच होतो.
हिवाळ्यात सकाळी-सकाळी पोट साफ होत नाही? बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Ayurvedic remedies to relieve constipation:   हिवाळा असो किंवा पावसाळा पोट साफ न होणे ही समस्या नेहमीच त्रास देत असते. पोट साफ न होण्याला बद्धकोष्ठता असे म्हटले जाते. बद्धकोष्ठतेमुळे फक्त पचनक्रियेत बिघडत नाही. तर त्यामुळे त्रिदोष असंतुलन, भूक न लागणे, दिवसभर आळस, तणाव अशा समस्या निर्माण होतात.

पोट साफ होण्यासाठी अनेकजण विविध प्रकारची औषधे आणि चूर्ण घेतात. परंतु त्याचा फायदा तेव्हढ्या पुरताच होतो. अनेकांना त्याचाही परिणाम होत नाही. त्यामुळेच आज आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत. जे सहजपणे आतड्यांची हालचाल सुधारून पोट साफ करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया हे उपाय….

 

तूप आणि कोमट पाणी-

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. किंवा एक चमचा तुपासोबत कोमट पाणी प्यावे. असे केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते. आणि सकाळी मल बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे अगदी सहजरित्या पोट साफ होते.

 

त्रिफळा पावडर-

त्रिफळा पावडर अतिशय गुणकारी असते. रात्री त्याचे सेवन केल्याने ती पोटाला डिटॉक्स करते. आणि आतड्यांना नैसर्गिकरित्या काम करण्यास मदत करते. रात्री अर्धा चमचा त्रिफळा पावडर गरम पाण्यासोबत घेतल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.

वेलची-
आयुर्वेदानुसार रात्री ८ पर्यंत तुम्ही जेवण केले पाहिजे. तसेच रात्री हलका आहार घेणे उत्तम असते. यामुळे तुमचे पोट हलके राहते आणि शौचासही समस्या येत नाही. तसेच रात्री झोपताना वेलची उशीजवळ ठेवणे चांगले असते. वेलचीच्या वासाने तणाव दूर होतो. शिवाय वेलचीचा वास पचनक्रिया गतिशील करतो. त्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.

हिरडा-
हिरडा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती विविध आरोग्य समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे. हिरडा सेवन केल्याने पोटाच्या समस्यादेखील दूर होण्यास मदत होते. रात्री हिरडा पावडर किंवा गोळी घेतल्याने आतड्यांचे कार्य सुधारते. आणि त्यामुळे सकाळी मल शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)