What to eat to reduce stress: आजकाल ताणतणाव ही एक्स सामान्य समस्या बनली आहे. बदलेल्या जीवनशैली आणि आहारामुळे विविध शारीरिक आणि मानसिक बदल होत आहेत. तसेच लोक प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसाठी तक्रार करत असतात. वाढत्या अपेक्षांमुळे सतत तणावात राहतात. ताणतणावामुळे फक्त मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यसुद्धा खराब होत आहे. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ताणतणाव दूर करून आनंदी राहण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. त्यासोबतच आहारात काही बदल करूनसुद्धा तणावमुक्त राहता येते. तज्ज्ञांच्या मते आहारात मॅग्नेशिअमसमृद्ध पदार्थ समाविष्ट केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते. आज आपण या पदार्थांबाबत जाणून घेऊया…..
तणाव दूर करण्यासाठी आवश्यक मॅग्नेशिअम-
ताणतणाव कमी करण्यास आणि मेंदूला विश्रांती देण्यात मॅग्नेशिअम महत्वाची भूमिका बजावते. आहारात मॅग्नेशिअमयुक्त पदार्थ समाविष्ट केल्याने मेंदूला आराम मिळतो, चिंता दूर होते आणि रात्री चांगली झोप येते. मॅग्नेशिअम शरीरात स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावतो. मॅग्नेशिअममध्ये असलेले गुणधर्म स्ट्रेस निर्माण करण्याची स्थिती सुधारतात त्यामुळे तणाव निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते.
मॅग्नेशिअमयुक्त आहार-
हिरव्या पालेभाज्या-
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी भाजीपाला आवर्जून खावा. यासाठी पालक, ब्रोकोली, शेवगा यांसारखे पदार्थ आहारात सामील करावे.
ड्रायफ्रूट्स आणि सीड्स-
बदाम, अक्रोड, मनुके, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांसारखे नट्स तुमच्या आहारात समाविष्ट करा. यामध्ये भरभरून मॅग्नेशिअम असते.
डाळी-
सर्व प्रकारच्या डाळी, बीन्स आणि हरभरे यामध्येसुद्धा मॅग्नेशिअम असते. त्यांचाही आहारात समाविष्ट करणे उत्तम असते.
मासे-
सॅल्मन आणि मॅकरेलसारख्या माश्यांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा ३ फॅटी ऍसिड आणि मॅग्नेशिअम असते. त्यामुळे मेंदूला आराम मिळून तणाव दूर होण्यास मदत होते.
डार्क चॉकलेट-
तणाव दूर करण्यासाठी डार्क चॉकलेटसुद्धा फायदेशीर आहे. त्यातून शरीराला अँटी-ऑक्सीडेन्ट आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे मेंदू शांत होतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





