Dahi bhendi recipe n marathi: काहींना चिकट गुणधर्मामुळे भेंडी खाणे आवडत नाही. तर काहींना भेंडी प्रचंड आवडते. त्यामुळेच आज आम्ही भेंडीची एक उत्कृष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण दही भेंडी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. ज्या लोकांना भेंडी आवडत नाही. तेसुद्धा दही भेंडी खाऊन भेंडीच्या प्रेमात पडतील. चला तर मग पाहूया सोपी रेसिपी…
हे ही वाचा
दही भेंडीसाठी साहित्य-
-२ कप चिरलेली भेंडी
-१ कप दही
-२ चमचे धणे पावडर
-२ चमचे लाल मिरची पावडर
-१/२ चमचा बेसन
-१ चमचा जिरे
-१ चमचा मोहरी
-१ चमचा बडीशेप
-१/८ चमचा हिंग
-५ ते ७ कढीपत्ता
-१ चमचा तेल
-चवीनुसार मीठ
दही भेंडी बनवण्याची रेसिपी-
-दही भेंडी बनवण्यासाठी, भेंडी ५ ते ७ मिनिटे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या. आणि बाजूला ठेवा.
-दही, धणे पूड, मिरची पूड, बेसन आणि मीठ २ टेबलस्पून घेऊन पाण्यात मिसळा.
-नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, बडीशेप, हिंग आणि कढीपत्ता घाला.
-मसाले तडतडत असताना, दही मिश्रण आणि वाफवलेली भेंडी घाला आणि उकळी आणा. पुन्हा मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा.
-कोथिंबीरने सजवलेली दही भेंडी सर्व्ह करा.