Thu, Dec 25, 2025

हिवाळ्यात केसांत कोंडा का होतो? ‘या’ आयुर्वेदिक उपायाने दूर होईल समस्या

Published:
आयुर्वेदात डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करणारे अनेक उपाय आहेत. त्यामुळे केसही चमकदार होतात.
हिवाळ्यात केसांत कोंडा का होतो? ‘या’ आयुर्वेदिक उपायाने दूर होईल समस्या

Ayurvedic remedies to remove dandruff from hair:   आयुर्वेदात प्रत्येक शारीरिक समस्येवर उपाय आहेत. त्याप्रमाणेच केसांच्या समस्यांवर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. आहारापासून ते विविध प्रॉडक्टसपर्यंत, केसांसाठी अनेक फायदेशीर पद्धती आहेत. केसांची एक प्रमुख समस्या म्हणजे डोक्यातील कोंडा.

टाळूची दीर्घकाळ स्वच्छता न केल्याने घाण साचते. याव्यतिरिक्त, टाळूचा कोरडेपणा किंवा संसर्ग वाढल्यानेदेखील डोक्यात कोंडा होऊ शकतो. आयुर्वेदात डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करणारे अनेक उपाय आहेत. आज आपण अशाच एका उपायाबाबत जाणून घेऊया….

केसांमध्ये कोंडा का होतो?
हिवाळ्यात कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे टाळूच्या पेशी आणि केसांमधून बाहेर पडणारे तेल जमा होणे. कधीकधी, टाळूवर इतके तेल जमा होते की संपूर्ण डोक्यावर पांढरा थर तयार होतो. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि तीव्र वेदना देखील होऊ शकतात.

केसांतील कोंड्यासाठी आयुर्वेदिक उपाय-
साहित्य-
आंब्याच्या कोयची पावडर – १० ग्रॅम
त्रिफळा पावडर – १० ग्रॅम
पाणी – ५०० मिली
ताक – ५०० मिली

बनवण्याची पद्धत-

– सर्वप्रथम एका पॅनमध्ये ५०० मिली पाणी गरम करा. गरम पाण्यात त्रिफळा पावडर आणि आंब्याच्या कोयची पावडर घाला आणि मिक्स करा.

– हे सर्व साहित्य चांगले उकळवा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. काढायसारखं थोडं घट्ट झाल्यावर ते एका भांड्यात काढा आणि थोडे थंड होऊ द्या.

– हे मिश्रण कोमट झाल्यावर, त्यात ५०० मिली ताक घाला. या मिश्रणाने केसांना चांगले मसाज करा आणि ते धुवा.

– लक्षात ठेवा, कोंडा दूर करण्यासाठी हा उपाय केल्यानंतर कोणताही शॅम्पू किंवा कंडिशनर वापरू नका.

– कोंडा दूर करण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने फायदा मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)