अनेकदा काहीतरी चटपटीत खावसं वाटतं म्हणून आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. स्नॅक्स टाईम झाला की वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्याची इच्छा होते. पण अगदी कमी साहित्य वापरून आपण ती घरीसुद्धा सोप्या पद्धतीने करू शकता. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पार्टी मेन्यूसाठी किंवा पाहुण्यांना खास काही द्यायचं असेल तर ‘चीज बॉल्स’, हा उत्तम पर्याय आहे. चला याची रेसिपी जाणून घेऊयात..
साहित्य
- उकडलेले बटाटे (४-५)
- किसलेले चीज (आवडीनुसार)
- ब्रेडक्रंब्स
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- आवडीचे मसाले (उदा. काळी मिरी पावडर, जिरे पावडर)
- मीठ (चवीनुसार)
- कॉर्नफ्लोअर
कृती
- उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यात किसलेले चीज, ब्रेडक्रंब्स, कोथिंबीर, मसाले आणि मीठ घालून चांगले एकत्र करा.
- या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवा.
- एका भांड्यात कॉर्नफ्लोअर घ्या आणि त्यात तयार केलेले गोळे व्यवस्थित घोळवा.
- एका कढईत तेल गरम करा.
- तेल गरम झाल्यावर तयार चीज बॉल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- गरम चीज बॉल्स टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
हे ही वाचा
1होळी पाकिस्तानातही साजरी केली जाते का? सर्वात मोठ्या प्रमाणात हा सण कुठे साजरा केला जातो?
2सारख्या त्या-त्या Reels पाहून कंटाळलात? ही ट्रिक वापरताच Instagram चा अल्गोरिदम होईल रीसेट!
3सकाळच्या रुटीनमध्ये सामील करा ‘या’ गोष्टी, त्वचेला मिळेल नैसर्गिक ग्लो
4घरातच लावा गुणकारी हळद, जाणून घ्या ‘या’ सोप्या गार्डनिंग टिप्स