What to do to keep the liver healthy: यकृत निरोगी ठेवण्यासाठी लोकांना चांगला आहार घेण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा आणि निरोगी जीवनशैली जगण्याचा सल्ला दिला जातो. यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यकृतामध्ये काही समस्या उद्भवली आणि तुम्ही निरोगी सवयींचा अवलंब केला तर तो औषधांशिवाय बरा होऊ शकतो. त्यामुळेच आज आपण काही टिप्स जाणून घेऊया ज्याचा अवलंब केल्यास यकृत निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होईल….
निरोगी आहार-
यकृतासाठी पौष्टिक अन्न आवश्यक आहे. जसे की, हिरव्या भाज्या (पालक, ब्रोकोली), फळे (सफरचंद, द्राक्ष, लिंबू), धान्य, काजू आणि ओमेगा-३ पदार्थ (अळशी, मासे) हे यकृत मजबूत करतात. जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा.
मद्यपान आणि धूम्रपान टाळा-
मद्यपान आणि धूम्रपान यकृतासाठी अत्यंत हानिकारक आहेत. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने सिरोसिस आणि फॅटी लिव्हरसारखे यकृताचे आजार होऊ शकतात. म्हणून, ते पूर्णपणे टाळणे चांगले.
नियमित व्यायाम-
दररोज ३०-४५ मिनिटे व्यायाम किंवा योग केल्याने मेटाबॉलीज्म व्यवस्थित राहतो आणि यकृतातील चरबीचे प्रमाण कमी होते. म्हणून चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योग यासारखे कोणत्याही प्रकारचे एरोबिक, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंगसारखे व्यायाम यकृतासाठी खूप फायदेशीर आहेत.
ब्लॅक कॉफी-
कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि इतर प्रक्रिया केलेले ड्रिंक यकृतातील चरबी वाढवतात. या ड्रिंक्सच्या जागी ब्लॅक कॉफी घ्या. ज्यामुळे यकृतातील चरबी कमी होण्यास आणि यकृताच्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते.
पुरेशी झोप-
झोपेच्या कमतरतेमुळे यकृतावर ताण वाढतो. दररोज ७-८ तास गाढ झोप घेतल्याने यकृत दुरुस्त होण्यास आणि पुन्हा कार्यरत होण्यास वेळ मिळतो.
जास्त पेनकिलर घेऊ नका-
डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय वेदनाशामक किंवा इतर औषधे घेतल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ही औषधे घ्या.
भरपूर पाणी प्या-
यकृताच्या योग्य कार्यासाठी हायड्रेशन आवश्यक आहे. दररोज ८-१० ग्लास पाणी पिल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृतावरील अतिरिक्त ताण टाळता येतो. कोमट पाणी पिणे आणखी फायदेशीर आहे.
वजन नियंत्रित करा-
लठ्ठपणामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे तुमचे वजन नियंत्रित करा.
ताणतणाव घेणे टाळा-
तणाव यकृतासाठी हानिकारक आहे. प्राणायाम, श्वसनाचे व्यायाम आणि तुमच्या आवडी जपून तुम्ही ताणतणाव दूर ठेऊ शकता.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






