Marathi recipe for Gulkand Barfi: गुलकंद आरोग्यासाठी जितके फायदेशीर असते तितकेच ते चवीलासुद्धा चविष्ट असते. गुलकंद दररोज खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण गुलकंद खाण्याऐवजी त्याचे विविध पदार्थ बनवून खाण्याला पसंती देतात. त्यापैकीच एक म्हणजे गुलकंद बर्फी होय. आज आपण गुलकंद बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा
1होळी पाकिस्तानातही साजरी केली जाते का? सर्वात मोठ्या प्रमाणात हा सण कुठे साजरा केला जातो?
2सारख्या त्या-त्या Reels पाहून कंटाळलात? ही ट्रिक वापरताच Instagram चा अल्गोरिदम होईल रीसेट!
3सकाळच्या रुटीनमध्ये सामील करा ‘या’ गोष्टी, त्वचेला मिळेल नैसर्गिक ग्लो
4घरातच लावा गुणकारी हळद, जाणून घ्या ‘या’ सोप्या गार्डनिंग टिप्स
गुलकंद बर्फीसाठी साहित्य-
२५० ग्रॅम दूध
५० ग्रॅम गुलकंद
१०० ग्रॅम सुकामेवा
२०० ग्रॅम मिल्कमेड
गुलकंद बर्फीची रेसिपी-
सर्वप्रथम, गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात दूध घाला आणि ते चांगले उकळवा.
दूध उकळू लागले की, त्यात मिल्कमेड घाला आणि ते आटेपर्यंत शिजवा. दूध चांगले सुकले की, त्यात ड्रायफ्रूट्स घाला.
आता एक प्लेट घ्या, त्यावर तूप लावा, त्यात बर्फी घाला आणि दोन तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
ते पूर्णपणे थंड झाल्यावर, ते तुमच्या आवडीच्या आकारात कापून घ्या.