श्रावण सुरू होणार म्हणत 5,000 किलो चिकन वाटले; पुण्यात मतदारांना गोंजारण्याचा अनोखा फंडा?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
काल श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा रविवार होता. त्यामुळे पुण्यात 5 किलो चिकनचे वाटप काहीजणांनी केले. 25 तारखेला श्रावण महिना सुरू होत आहे.
श्रावण सुरू होणार म्हणत 5,000 किलो चिकन वाटले; पुण्यात मतदारांना गोंजारण्याचा अनोखा फंडा?

काल श्रावण सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा रविवार होता. अनेकांनी हा रविवार चांगलाच गाजवला. तिकडे पुण्यातील धानोरी परिसरात तब्बल 5000 किलो मोफत चिकन वाटप करण्यात येत होतं. हे चिकन वाटप धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, या उपक्रमामागे पुजाताई जाधव यांचा पुढाकार होता. या घटनेची दखल चांगलीच घेतली गेली. परंतु, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी मतदारांना गोंजारण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

5 हजार किलो चिकन वाटले; मतदार खूश?

ण्यात “कधी काय होईल सांगता येत नाही” हे वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. कारण, आज आखाड्याचा शेवटचा रविवार असताना शहरातील चिकन-मटन दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र यावेळी या गर्दीचं कारण वेगळंच होतं. कारण धनोरी परिसरात तब्बल 5000 किलो मोफत चिकन वाटप करण्यात येत होतं. हे चिकन वाटप धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, या उपक्रमामागे पुजाताई जाधव यांचा पुढाकार होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आल्याची चर्चा आहे.

आधी ओळखपत्र तपासणी, मग चिकन…

उल्लेखनीय बाब म्हणजे, चिकन देताना प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्राची तपासणी करण्यात आली. त्यामुळे केवळ धनोरी परिसरातील रहिवाशांनाच या मोहिमेचा लाभ मिळाला. पुजाताई जाधव म्हणाल्या, “लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भरून आलं. एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांना थोडा का होईना आधार मिळावा हीच आमची भावना होती.”

आगामी निवडणुका लक्षात घेता अनेक राजकीय नेते आता जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे राजकीय वातावरण तापू लागल्याचं बोललं जात आहे. काहींनी यावर टीका केली असली तरी, स्थानिक पातळीवर या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र लक्षणीय ठरला आहे.