एलफिस्टन पुलाजवळील 83 कुटुंबांचे म्हाडाच्या घरात पुनर्वसन होणार; प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
एलफिन्स्टन ब्रिज हा पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकानी नवीन ब्रिज उभारण्यात येणार आहे. एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार आहे.
एलफिस्टन पुलाजवळील 83 कुटुंबांचे म्हाडाच्या घरात पुनर्वसन होणार; प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी निर्णय

मोठी बातमी मुंबईतून समोर येत आहे. यामध्ये एलफिस्टन पूल बाधित कुटुंबांना आता न्याय मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीत यासंदर्भात मोठा निर्णय खरंतर घेण्यात आला आहे. या परिसरातील दोन इमारतींवर हातोडा पडणार आहे. त्यामुळे या दोन इमारतींमधील 83 रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येणार आहे.

एलफिस्टन पूल बाधितांना दिलासा

मुंबईतील परेल आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एलफिन्स्टन ब्रिज हा पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ठिकानी नवीन ब्रिज उभारण्यात येणार आहे. एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये होणार आहे. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बाधित दोन इमारतीतील 83 प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुढाकाराने निर्णय

येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.
वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधीत होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडामधील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
लक्ष्मी निवास इमारतीमधील 60 प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील 23 प्रकल्पग्रस्त अशा एकूण 83 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण 19 इमारती बाधित होणार होत्या पण MMRDAने रचनात्मक बदल करून 17 इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला. यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर सुमारे पुनर्वसनावर होणारा 5200 कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल.