उकाड्याने हैराण असलेल्या उपनगरात पावसाची अचानक हजेरी, कुठे-कुठे बरसला पाऊस?

Written by:Astha Sutar
Published:
दुसरीकडे शेतीसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा हवामान खात्याने म्हटलं होतं. तर या पावसामुळे पाणीसाठा झाला आहे. पण पाऊस शेतीसाठी योग्य नसल्याचं कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
उकाड्याने हैराण असलेल्या उपनगरात पावसाची अचानक हजेरी, कुठे-कुठे बरसला पाऊस?

State Rain – 25 आणि 26 मे रोजी राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईचे तुंबई झाली तर मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी तुंबले. दरम्यान, मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाने घेतल्यामुळे उसंत आणि विश्रांती घेतल्यामुळे दिवसभर ऊन असते.

त्यामुळे मागील चार-पाच दिवसात प्रचंड उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही  होत आहे. गर्मीचा सामना करावा लागला होता. परंतु उपनगरात आज अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळं वातावरणा काहीसा गारवा निर्माण झाला.

पावसाची दमदार हजेरी कुठे?

दरम्यान, आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात कडाक्याचे ऊन यामुळे घामाच्या धारा तसेच अंगाची लाही-लाही होत होती. प्रचंड गर्मीमुळं सर्वंच त्रस्त असल्याचे जाणवले. परंतु 11 ते 12 च्या दरम्यान पाऊस तुफान बरसला. हा पाऊस बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर आदी ठिकाणी कोसळला. त्यामुळे गर्मीमुळे हैराण असलेल्या लोकांना या पावसामुळे वातावरणातील थंडावा पाहायला मिळाला.

पेरणीची घाई करु नये…

या आठवड्यात मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस लागण्याची शक्यता आहे. कारण दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असूनही आठवड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 मे ला महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे मान्सून महाराष्ट्रात खरोखरचं दाखल झालाय की नाही? असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.