निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार प्रकरणी भ्रष्टनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, आणि ईडीने चौकशी करावी, आदित्य ठाकरेंची मागणी

Written by:Astha Sutar
Published:
एमएमआरडीएचे खाते त्यांच्याकडे असल्याने देवेंद्रजी यांनी त्यांचा राजीनामा घेऊन चौकशी करावी. आता फडणवीस यांनी भ्रष्टनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावे. फडणवीस यांना त्यांची गरज नाही.

Aditya Thackeray – वसई – भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाची अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची निविदा रद्द केली. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी असा गायमुख, ठाणे – फाऊंटन हाॅटेल नाका, वसई दुहेरी बोगदा आणि फाऊंटन हाॅटेल नाका आदी कामांच्या आता नव्याने या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

त्यामुळं यात घोटाळा झाला असून, भ्रष्टनाथ शिंदे यांची ईडीने चौकशी करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टनाथ शिंदे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांची चौकशी करावी चौकशी होईपर्यंत भ्रष्टनाथ शिंदे यांना मंत्रीपदापासून दुर ठेवावे, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.

आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी लावणार का?

आज मुख्यमंत्री महोदयांना थेट प्रश्न विचारतोय की ज्यांच्याकडे हे खाते आहे, त्या भ्रष्टनाथ शिंदे यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची (EOW) चौकशी लावणार आहात का? त्यांची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ED) चौकशी होणार आहे का? भ्रष्टनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीही हे खाते होते, तेव्हाच्या प्रकरणांची ईडी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे का? न्यायालयाच्या कठोर ताशेऱ्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले, याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, यात काहीतरी गैरव्यवहार झाला आहे.

‘सत्तामेव जयते’ ऐवजी ‘सत्तमेव जयते’ हेच खरे

MMRDA च्या निविदा प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची हिंमत दाखवल्याबद्दल L&T कंपनीचे अभिनंदन. या प्रकरणात सुरुवातीपासूनच घोटाळ्याची शक्यता वर्तवली जात होती, यामध्ये मी वारंवार पत्रकार परिषद घेऊन घोटाळा बाहेर काढत होतो. विशेषतः ज्याप्रकारे ‘शॉर्ट टेंडर’ काढण्यात आले, तेव्हाच यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावेळी एमएमआरडीएने निविदा कालावधी वाढवण्याची घोषणा केली होती, पण तरीही हा घोटाळाच असल्याच सिद्ध झालं होत. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर माध्यमांतील हेडलाईन्स पाहता, ‘सत्तामेव जयते’ ऐवजी ‘सत्तमेव जयते’ हेच खरे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे…

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews