आजपासून अकरावीचे प्रवेश; पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत मुदत!

Written by:Rohit Shinde
Published:
30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.
आजपासून अकरावीचे प्रवेश; पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत मुदत!

अकरावी प्रवेशासाठी सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे.

महाविद्यालयात प्रवेश निश्चित करा

पहिल्या गुणवत्ता यादीत ज्यांना संधी मिळाली आहे अशा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चिती करावी लागणार आहे. यासाठी आजपासून 7 जुलैपर्यंत मुदत असणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात वारंवार बदल झाल्याने विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले होते. शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना ३० जून ते ७ जुलै दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा ९ जुलै रोजी जाहीर होणार आहेत.

नियमित फेरी एक मधील कॅप व कोटाअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यवाहीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यानंतर ३० जून ते ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठीची मुदत देण्यात आली आहे. तर ९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ७ जून रोजी ऑनलाईन अर्ज नोंदणी पूर्ण झाली. परंतु तांत्रिक अडचणीमुळे अद्याप प्रक्रियेत पहिली फेरीही सुरू होऊ शकलेली नाही. त्यात दोन दिवसात पुन्हा वेळापत्रकातील बदलामुळे प्रक्रिया चर्चेत आली. अखेर शनिवारी गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने विद्यार्थी, पालकांची प्रतीक्षा संपली. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.