चार दिवसानंतर मुंबईत आज सूर्याचे दर्शन, पावसाची विश्रांती, मुंबईकर उकाड्याने हैराण… 

Written by:Astha Sutar
Published:
कडाक्याचे ऊन असल्यामळं मुंबईकरांना उन्हाळ्याचा फिल आला. तर प्रचंड उन्हाळामुळं वातावरणा उकाडा जाणवला, घामाचा थारा वाहत होता. त्यामुळं आज मुंबईकर गरमीमुळं हैराण होतानाचे चित्र दिसले.
चार दिवसानंतर मुंबईत आज सूर्याचे दर्शन, पावसाची विश्रांती, मुंबईकर उकाड्याने हैराण… 

Mumbai Rain – मुंबई, उपनगरसह राज्यातील अनेक भागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतूकीवर दिसून आला. तर मुंबईत ठीकठिकाणी भागात पाणी तुंबले. सोमवारी पडलेल्या पावसामुळं मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र मंगळवारी, बुधवारी पावसाने उसंत घेतली होती. तर आज चक्क मुंबईत सूर्याचे दर्शन झाले.

चक्क मुंबईत आज सूर्याचे दर्शन…

सोमवारी राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसामुळं मुंबईकरांचे हाल पाहयाल मिळाले. मात्र गेल्या चार दिवसांपासून आज चक्क मुंबईत सूर्य नारायणाचे दर्शन झाले. तर सकाळापासून पावसाने विश्रांती घेतली असून, कडाक्याचे ऊन असल्यामळं मुंबईकरांना उन्हाळ्याचा फिल आला. तर प्रचंड उन्हाळामुळं वातावरणा उकाडा जाणवला, घामाचा थारा वाहत होता. त्यामुळं आज मुंबईकर गरमीमुळं हैराण होतानाचे चित्र दिसले.

मंगळवारी, बुधवारी रिमझिम… 

दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला होता. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावारण राहिले, तर बुधवारी सुद्धा सकाळापासून मुंबईत रिमझिम पाऊस पडला होता. तसेच दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे आकाश ढगाळ राहिले होते. आणि मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. पण मुंबईत दोन दिवसांपासून रिमझिम पाऊसाने हजेरी लावली आहे.