मराठवाड्यातील लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर पासून बीड ते अहिल्यानगर (Ahilyanagar Beed Railway) असा नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यात येणार आहे. राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली होती. आता बीड ते अहिल्यानगर रेल्वे कोणकोणत्या स्थानकावर थांबणार आहे आणि या रेल्वेचे तिकीट किती असेल याबाबत नवीन अपडेट समोर आले आहेत.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार??
अहिल्यानगर ते बीड हा रेल्वेमार्ग जवळपास 261 किलोमीटर लांबीचा असेल. यासाठीबीड शहरातील पालवन चौकात रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, बीड ते अहिल्यानगर रेल्वे एकूण 16 स्थानकांवर थांबणार आहे यामध्ये अहिल्यानगर नारायण डोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा, आष्टी, किन्ही, बावी, अळमनेर, घाटनांदुर, विगणवाडी, रायमोह, राजुरी, आणि बीड या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. Ahilyanagar Beed Railway
तिकीट किती असेल ?? Ahilyanagar Beed Railway
अहिल्यानगर ते बीड या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना किती रुपयांचे तिकीट मोजावे लागेल याबाबत समोर आले आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार पहिल्या नगर वरून बीड ने रेल्वे प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना फक्त चाळीस रुपये खर्च करावा लागेल.
कसा आहे रेल्वे प्रकल्प??
बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261.25 किलोमीटर आहे. यादरम्यान, रेल्वे खालील एकूण पुलांची संख्या १३०, तर रेल्वे वरील पुलांची संख्या ६५ असेल. तसेच ६५ मोठे पूल आणि ३०२ छोट्या पूलांचाही समावेश असेल. बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गासाठी १८२२.१६८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे. द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत ४८०५.१७ कोटी आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 50 टक्के आणि राज्य सरकार 50 टक्के हिस्सा उचलणार आहे.






