13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या काळात शेती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी सरकारी मदतीची आस लावून बसले आहेत. अलीकडेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या संदर्भात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान
क लाख वीस हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. यामध्ये एक लाख 40 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजरी, कापूस, सोयाबीन यांसह नदीकाठच्या फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित काम करत असून, नुकसानग्रस्त पिकांना पुन्हा उभारणी करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील. यासाठी क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले असून, शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याच्या तंत्रांची माहिती दिली जाईल.
बाजरी, कापूस, सोयाबीन यांसह विविध पिकांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कृषी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.
सरसकट पंचनामे करा -राधाकृष्ण विखे पाटील
मंत्री विखे म्हणाले की, दोन दिवसापासून झालेल्या या नुकसानीमुळे शासन स्तरावर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही. त्या ठिकाणचे कर्मचारी या बाधितग्रस्त भागांमध्ये बोलून तातडीने पंचनामे करण्यात यावे. तसेच अनेक ठिकाणी शेतांमध्ये थेट पाणी असल्यामुळे पंचनामे करण्यास अडचण आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे.
सळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल एक लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेले आहे. या भागांमध्ये झालेले नुकसान पाहता एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जाईल. नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जाती पंचनामे केली जाते. मात्र, त्यांना मदत मिळाली जात नाही, असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला होता. यावरती उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, यापूर्वी अकोळनेर तसेच अनेक ठिकाणी पावसामुळे जे नुकसान झाले, त्या ठिकाणचे पंचनामे होऊन त्या ठिकाणी मदतही जाहीर झाली. मात्र, विरोधकांचे कामच आहे, आरोप करणे. अशा शब्दांत या मुद्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना विखे पाटलांनी खडसावले आहे.





