आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे. वाचा अपघाताचे सविस्तर कारण आणि घटनाक्रम…
अपघात नेमका कुठे झाला?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. लँडिंगदरम्यान बारामतीजवळ एका शेतात त्यांचं विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
अपघात कसा झाला?
अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच विमानाने भीषण पेट घेतला. त्या विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. संपूर्ण विमान जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळांनी वेढल्या गेलेल्या या विमानाजवळ नंतर सर्वत्र फक्त धुराचे लोट दिसून येत होते. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवेत धुराचे लोट पसरले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






