Ajit Pawar Plane Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंग करत असताना हा गंभीर विमान अपघात झाला आहे. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक असल्याचे बोललं जात आहे. या अपघातात काही जण जखमी झाल्या असल्याची समोर येत आहे.
नेमकं काय घडलं Ajit Pawar Plane Accident
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाला भीषण अपघात झाला.






