Marathi News

ZP Elections: अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हापरिषद निवडणुका पुढे ढकलणार का? महत्वाची अपडेट

Published:
या धक्कादायक घटनेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
ZP Elections: अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हापरिषद निवडणुका पुढे ढकलणार का? महत्वाची अपडेट

Ajit Pawar news:   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार एका खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते. विमान लँडिंग होत असताना अपघात झाला आणि इंधन टाकीचा स्फोट झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या सर्व घटनेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जाणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

निवडणूककाळात मुख्य पदावरील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्याने राजकारणातील अनेक गोष्टी बदलत आहेत. परंतु निवडणूक आयोगातील सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्याने त्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही.

या निवडणूक महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात होतील.

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी म्हटले होते की, १ जुलै २०२५ रोजी निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरल्या जातील. नियमांनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांसाठी मतदार याद्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत आणि या टप्प्यावर कोणतीही नावे जोडता किंवा वगळता येणार नाहीत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews