Marathi News

अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात, अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू

Written by:Smita Gangurde
Last Updated:
या अपघातात काही जणं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनाही या अपघातात गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात, अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू

बारामती- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला अपघात झालाय. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झालाय. बारामतीत लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात काही जणं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं

राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. अजित पवार यांनी पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यासाठी प्रचारसभेसाठी अजित पवार बारामतीत येत असताना लँडिंगवेळी विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.

विमान कोसळल्यानंतर प्रचंड गर्दी आणि धूर

विमान कोसळल्यानंतर विमानातून धूर आणि आग येत होती. विमान कोसळताच स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेत बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे. विमानात कोण होतं याची माहिती अद्याप समोर आलेलं नाही, मात्र अजित पवार यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

पवार कुटुंबीय दिल्लीहून बारामतीकडे रवाना 

अजित पवार यांचा या अपघातात  मृत्यू झालेला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पार्थ पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दिल्लीत आहेत. ही बातमी कळाल्यानंतर हे तिघेही विमानानं बारामतीकडे रवाना होणार आहेत. शरद पवार हे सध्या महाराष्ट्रात आहे.

 

Follow Us :GoogleNews