Marathi News

अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून अष्टविनायक विकास आराखड्यास 148 कोटीची मान्यता, आध्यात्मिक पर्यटनविकासाला गती मिळणार

Written by:Astha Sutar
Published:
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधीत आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात.
अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून अष्टविनायक विकास आराखड्यास 148 कोटीची मान्यता, आध्यात्मिक पर्यटनविकासाला गती मिळणार

Ajit Pawar : एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.  अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार आहे.

पर्यटकांना, भाविकांना, पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार असून, अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न…

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या मान्यनेनंतर दोन आठवड्यातंच 147 कोटी 81 लाख खर्चाचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय आज जारी झाला. चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार 2021-22 मध्ये 92 कोटी 19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. सरकारच्या या निर्णयाबद्दल अष्टविनायक भक्तांकडून, स्थानिक नागरिकांकडून सरकारचे आभार मानण्यात आलेत.

कुठल्या देवस्थानसाठी किती निधी…

  • पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख
  • थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख
  • ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख
  • रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख
  • रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख
  • पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये
  • अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख
Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews