Ajit Pawar Last Call : मृत्यूच्या ९ मिनिटांपूर्वी अजितदादांचा कार्यकर्त्याला कॉल, ऑडिओ क्लिप समोर…

Published:
अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी हा कॉल केला होता, म्हणजेच विमान अपघात होण्याच्या आधी काही मिनीटे आधीचा हा त्यांचा शेवटचा कॉल होता.
Ajit Pawar Last Call : मृत्यूच्या ९ मिनिटांपूर्वी अजितदादांचा कार्यकर्त्याला कॉल, ऑडिओ क्लिप समोर…

विमान अपघात होण्याच्या अवघ्या १० मिनिटे आधी अजित पवार यांनी कार्यकर्त्याशी फोनवर संवाद साधला होता. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलमधील शब्द आणि नेमकं काय बोलणं झालं? वाचा…

कोणाला केलेला शेवटचा कॉल?

विमान अपघाताच्या अवघ्या ९ मिनिटे आधी अजित दादांनी सुपे येथील कार्यकर्ते श्रीजीत पवार यांच्याशी संवाद साधला होता.  हा कॉल अपघाताच्या अवघ्या ९ मिनिटे आधी म्हणजेच सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी झाला होता. त्यानंतर ८ वाजून ४६ मिनिटांनी विमानाचा अपघात झाला . ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीजीत पवार यांनी अजित दादांच्या शेवटच्या संवादाचे रेकॉर्डिंग सर्वांसमोर मांडले. या संवादातून अजित पवारांच्या निधनापूर्वीचे शेवटचे शब्द आणि कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची नाळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

हा कार्यकर्ता कोण?

श्रीजीत पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते असून अजित पवार यांचे चुलत पुतणे आहेत. श्रीजीत पवार हे बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ता आहेत. श्रीजीत पवार यांनी अजित पवारांना जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार निवडीबाबत, विशेषतः माळी समाजाला उमेदवारी देण्याबाबत मेसेज केला होता. त्यांनी या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली होती. ही तक्रार दादांपर्यंत पोहोचताच, २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवारांनी या मेसेजला उत्तर देण्यासाठी त्यांना विमानातून फोन केला होता. या कॉलमध्ये अजित पवारांनी “आपण सर्व समाजाला सोबत घेऊन निर्णय घेऊ,” असे आश्वासन दिले होते. या फोन कॉलमुळे त्यांचा गैरसमज दूर झाला होता, मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही दुर्दैवी घटना घडली.  श्रीजीत पवार त्यांनीच ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या निधनापूर्वीची ही शेवटची ऑडिओ क्लिप सर्वांसमोर आणली .

शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा नेमकं काय म्हणाले ?

दादा म्हणाले, “आपण कोणावरही अन्याय केलेला नाही. झेडपीच्या सुपे गटातून माळी समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालतोय. मनात कोणताही गैरसमज ठेवू नका.  “आजवर आपण सर्वांना न्याय देण्याचाच प्रयत्न केला आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. संवादाच्या शेवटी त्यांनी सांगितले, “मी आता विमानात आहे, १० मिनिटांत लँडिंग होईल. उतरलं की सर्वात आधी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी काटेवाडीला जाणार आणि त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडणार.” हा कॉल संपल्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या संवादाचा रेकॉर्ड श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)