अजित पवार राज्यातील महायुती सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील सिंचन घोटाळ्याची चर्चा चांगलीच मागे पडली, त्यानंतर आता या प्रकरणात अंजली दमानियांची उद्वीग्न अशी प्रतिक्रिया समोर आली आहे. लढण्याचे बळ संपत चालल्याने अंजली दमानियांनी म्हटले आहे. अंजली दमानियांनी नेमकी अशी प्रतिक्रिया का दिली, नेमकं काय घडलंय, ते सविस्तर जाणून घेऊ…
नेमकं काय घडलं?
सिंचन घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत 303 कोटी रुपयांची भरपाई एफ. ए. एंटरप्रायजेसला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. अशी भावनिक पोस्ट केली आहे.
हे ही वाचा
तर दुसरीकडे या प्रकरणात एफ. ए. एंटरप्रायजेस कंपनी विरोधात एसीबीने तीन हजार पानाचे आरोपत्र दाखल करत गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला होता. या घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानंतर विरोधक चारही बाजूने राज्य सरकारवर टीका करत आहे.
बाळगंगा धरण प्रकल्पावर या सिंचन घोटाळ्यावरुन तत्कालीन सरकारला विरोधकांनी चांगलाच कोंडीत पकडले होते. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. तर या प्रकरणात तीन हजार पानाचे आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते मात्र आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एफ. ए. एंटरप्रायजेस कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
अंजली दमानियांची प्रतिक्रिया
अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले आहे की, लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. जीवाची पर्वा न करता, वेड्यासारखे सिंचन घोटाळ्या विरुद्ध लढलो. त्या निसार खत्री नावाच्या काँट्रॅक्टर ला जेल मध्ये पाठवले, आणि आज त्याच व्यक्तिला, उरलेले 300 कोटी देण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने दिला. लढण्याची टाकत आणि इच्छा दोन्हीही संपत चालली आहे. अतोनात दुःख होतय. असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.