राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते?

Written by:Astha Sutar
Published:
महत्वाचे म्हणजे राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आजच्या या बैठकीत एकूण 9 निर्णय घेण्यात आले.
राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते?

State Cabinet Meeting – आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 9 निर्णय घेण्यात आले. यामध्ये विधि व न्याय विभागातील दोन, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील एक, जलसंपदा विभागातील एक, सहकार विभागातील दोन, कामगार विभागातील एक, सार्वजनिक बांधकाम विभागातील एक, आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील एक निर्णय घेण्यात आला. महत्वाचे म्हणजे राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

बैठकीत महत्वाचे निर्णय कोणते?

  • बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता
  • पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर निगडे, (ता. भोर) या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर, ता शेवगाव, अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता
  • पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लि. चिंतामणीनगर, मु. पो. थेऊर (ता. हवेली) या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता.
  • नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता, प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास, प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरीता मान्यता.

विश्वस्त व्यवस्था अधिनियम सुधारणा करणार 

  • बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्यानुषंगाने न्यायीक अधिकारी व कर्मचारीवृंद यांची पदे निर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता.
  • महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. 
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार.
  • नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाव्दारे-प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी बाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ