बदलापूरकरांचा प्रवास होणार सुसाट, कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोच्या लवकरच निविदा निघणार, कशी असणार मार्गिका?

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
या मेट्रोच्या कामासाठी मिलान मेट्रो सल्लागार कंपनीही पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक आहे. तसेंच ही मेट्रो मार्गिका ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून जाणार आहे. त्यामुळे सध्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याचे काम सुरु आहे. पण या मेट्रोमुळे लाखो प्रवाशी यांचा वेळ वाचणार आहे. आणि बदलापूरकरांचा प्रवास सुद्धा सुसाट होणार असल्याचे बोलले जात आहे.
बदलापूरकरांचा प्रवास होणार सुसाट, कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोच्या लवकरच निविदा निघणार, कशी असणार मार्गिका?

Badlapur Metro – बदलापूरकरांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बदलापूरहुन मुंबईत येण्यासाठी कित्येक मिनिटे ट्रेनची वाट पहावी लागते. तसेच मुंबईत येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. मात्र आता बदलापूरकरांचा मुंबईत येण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. कारण बदलापूर ते कांजूरमार्ग असे मेट्रो मार्गीकेचे काम हाती लवकरच घेतले जाणार आहे. आणि यासाठी या कामासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत निविदा ही काढल्या जाणार आहेत.

३८ किमी लांबीची मेट्रो मार्गिका…

दरम्यान, सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ३८ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेनंतर आता कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ ही मुंबईतील दुसरी पीपीपी तत्त्वावरील मेट्रो मार्गिका ठरणार आहे. ही मार्गिका घनसोली, निळजे आदी भागांना थेट जोडली जाणार आहे.

कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) महिनाअखेरपर्यंत टेंडर (स्वारस्य निविदा) काढली जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. ठाणे खाडी परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास ५.७ किमी असेल. तर, घनसोली ते बदलापूर हा मार्ग उन्नत असेल. कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका ही एकूण ३८ किमी लांबीची असणार आहे.

एकूण किती स्थानके असणार?

कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेवर एकूण १५ स्थानके असतील. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. तसेंच या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग पारसिक हिल भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षिता आहे. त्याचा डीपीआर मिलान मेट्रो या इटालियन कंपनीने तयार केला आहे.

हा डीपीआर आयआयटी मुंबईकडून तपासून घेण्यात आला आहे. तसेंच या मेट्रो मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य निविदा या महिनाअखेर मागविल्या जाणार आहेत. तसेंच याचा मार्ग कांजूरमार्ग – घणसोली, महापे, अंबरनाथ, बदलापूर असा असणार आहे. लांबी सुमारे ३८ किमी असुन्, अपेक्षित प्रवासी संख्या ७ लाख असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.