नवरात्रीच्या काळात ठाणे शहरात वाहतूक कोंडी ही एक सामान्य समस्या बनते. या काळात शहरातील मंदिरांमध्ये दर्शनार्थी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर गाड्यांची रांग उभ्या राहते, ट्राफिक लाइट्सवर जाम होते आणि प्रवाशांना मोठा वेळ उशीर सहन करावा लागतो. शहरी वाहतूक पोलिसांनी मार्गदर्शन करत असले तरी गर्दी कमी होत नाही. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक वापरणे, सकाळी किंवा रात्रीच्या वेळात प्रवास करणे, तसेच पर्यायी रस्ते निवडणे या उपाययोजनांनी कोंडी काही प्रमाणात टाळता येऊ शकते. त्या दृष्टीने ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
नवरात्री काळात ठाणे मार्गांवर अवजड वाहनांना बंदीचा निर्णय घेत त्यासंदर्भात पोलिसांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता 20 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोंबर म्हणजे दसऱ्यापर्यंत अवजड वाहनांना ठाणे मार्गांवर बंदी घालत असल्याचे आदेश मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी जारी केले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे नवरात्री काळात आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
याकाळात मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ बंदी असेल. गुजरातहून येणाऱ्या अवजड वाहन खानिवडे टोल नाका येथे बंदी असणार आहे. पालघरहून येणाऱ्या अवजड वाहनांना शिरसाट फाटा येथे बंदी असेल. वसईहून येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी फाटा येथे बंदी असणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुढाकार
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उप– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बैठक घेतल्यानंतर अवजड वाहनांना सकाळी 6 ते दुपारी 11 आणि दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत बंदी घालत असल्याचे आदेश ठाणे वाहतूक पोलिसांनी जारी केले होते. मात्र, तरी देखील बंदी कालावधीत अनेक अवजड वाहने घोडबंदर येथील गायमुख मार्गांवरून ठाण्यात येत असल्याचे आरोप भाजपसह अन्य सर्वाकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे व मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी आपला दौरा आयोजित केला होता. मात्र, ऐन वेळी तो रद्द करण्यात आला.






