मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात लोकल ट्रेनचे अत्यंत महत्त्व आहे. ती मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. लाखो प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करतात, कारण ती जलद, स्वस्त आणि वेळ वाचवणारी आहे. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्व लोकांसाठी लोकल ही अविभाज्य गरज बनली आहे. आता पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने 14 ठिकाणांवरील वेग निर्बंध हटवले!
लोकल वेळेवर चालाव्यात यासाठी पश्चिम रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. गेल्यावर्षी पश्चिम रेल्वेने अनेक ठिकाणच्या वेग मर्यादा काढल्या, तसेच रेल्वे मार्गाची वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती केली. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 24 एप्रिल ते 25 जुलै या दरम्यान रेल्वेकडून 14 ठिकाणी कायमस्वरुपी वेग निर्बंध लागू केले होते. चर्चगेट ते विरार मार्गावर सुरक्षेच्या कारणासाठी लावलेले वेग निर्बंध आता रेल्वेकडून काढण्यात आले आहेत.
श्चिम रेलवेकडून 14 ठिकाणी वेग निर्बंध लावण्यात आले होते हे वेग निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामुळे चर्चगेट ते विरार रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. गर्दी, वेळापत्रक आणि वेळेवर पोहोचण्याची खात्री यामुळे लोकलवर प्रचंड विश्वास ठेवला जातो. मुंबईतील वाहतुकीचा कणा म्हणून लोकलची ओळख आहे. त्यामुळे लोकलशिवाय मुंबईचं जीवन अपूर्ण वाटतं. यामुळेच वेग निर्बंध हटविल्याने आता मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे.
मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे मोठे महत्व
मुंबईकरांच्या जीवनात लोकल ट्रेनचे फार मोठे आणि अविभाज्य स्थान आहे. “मुंबईची जीवनवाहिनी” म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन दररोज लाखो प्रवाशांचे जीवन सुलभ करते. कामावर जाणारे नोकरदार, कॉलेजमधील विद्यार्थी, व्यावसायिक, घरगुती काम करणारे व्यक्ती – सगळ्यांचं रोजचं आयुष्य या ट्रेनवर अवलंबून आहे. लोकल ही फक्त एक वाहतुकीचे साधन नसून, ती वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत करणारी सोय आहे.
मुंबईतील तीव्र गर्दीतून मार्ग काढत ही ट्रेन शहराच्या विविध भागांमध्ये लोकांना जोडते. वेळेचं काटेकोर नियोजन आणि सततची सेवा ही लोकलची वैशिष्ट्ये आहेत. अनेकांना वेळेत कार्यालय, शाळा किंवा व्यवसायस्थळी पोहोचण्यासाठी लोकल ही एकमेव पर्याय आहे. तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा लोकलमुळे प्रवास सोपा होतो. तसेच, लोकलमधील प्रवासात विविध सामाजिक अनुभव आणि विविध स्तरांतील लोकांचे सहप्रवासही अनुभवायला मिळतो. म्हणूनच मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे मोठे महत्त्व आहे – ती म्हणजे मुंबईची धडधडणारी नस आहे. त्यामुळे लोकल रेल्वेच्या नियोजनात होणार छोटासा बदल देखील मुंबईकरांसाठी महत्वाचा असतो.






