ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि ‘ते’ 2,100 रूपये नेमके कधी मिळणार? आदिती तटकरेंनी उत्तर दिले, म्हणाल्या…

Written by:Rohit Shinde
Published:
लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे...
ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि ‘ते’ 2,100 रूपये नेमके कधी मिळणार? आदिती तटकरेंनी उत्तर दिले, म्हणाल्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. खरंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तसे घडलेले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँकेत दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. या विषयावर आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे?

ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे. एकूणच लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य केलं आहे. महिन्याच्या हप्त्याबाबत भाष्य करताना म्हटलं, “लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरू ठेवण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. लाडकी बहीण योनजेचा जो काही लाभ आहे तो अशाच प्रकारे सुरू राहणार आहे” त्यामुळे महिलांच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

२,१०० रूपये महिलांना कधी मिळणार?

जो काही जाहिरनामा असतो तो पाच वर्षांसाठी असतो. आम्ही जाहिरनाम्यात 2100 रुपयांचं आश्वासन महायुतीने दिलं होतं आणि ते नक्कीच आम्ही पूर्ण करू. सध्या प्राधान्य हे योजनेचा लाभ नियमितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आहे. ज्या वेळी योग्य वेळ असेल त्यावेळी नक्कीच 2100 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देखील आदिती तटकरेंनी दिली आहे.