लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मराठी बोलता येत नसले तर त्यांच्या कानाखाली मारणं हा उपाय नाही, तर ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. असं म्हणत सामंत यांनी मनसेला टोला लगावला. विशेष म्हणजे एखाद्या राज्याचं वैश्विक भाषा केंद्र तयार करणारं महाराष्ट्र हे पाहिलं राज्य असणार आहे.
लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant : न. चि. केळकर यांनी पुढाकार घेऊन लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आहे. या मंडळाची इमारत लिलाव मराठी भवनासाठी महाराष्ट्र सरकारने 5 कोटी रुपयामध्ये जिंकला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. तसेच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार आहे. जगाचं मराठी भाषा केंद्र असेल. त्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आज उदय सामंत यांनी मंत्रालयातील विधिमंडळ वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

वैश्विक भाषा केंद्र उभारणारं महाराष्ट्र राज्य पहिलं

दरम्यान, पुढे बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, मराठी बोलता येत नसले तर त्यांच्या कानाखाली मारणं हा उपाय नाही, तर ज्यांना मराठी येत नाही त्यांना शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. असं म्हणत सामंत यांनी मनसेला टोला लगावला. विशेष म्हणजे एखाद्या राज्याचं वैश्विक भाषा केंद्र तयार करणारं महाराष्ट्र हे पाहिलं राज्य असणार आहे. एक-दोन महिन्यांत ही जागा ताब्यात घेतली जाईल. तसेच मराठी भाषा आम्हाला सातासमुद्रापार न्यायची आहे, त्यादृष्टीने आम्ही प्रत्यक्ष कार्यवाही केलेली आहे. दरम्यान, या परिसरात 1 लाख मराठी बांधव राहत आहेत. त्यांच्या मुलांना मराठी भाषा बोलता यावी, यासाठी उपक्रम राबवणार असल्याचे सामंत म्हणाले.

‘मिलाप’ नावाचं अँप आणणार

दुसरीकडे उद्योग विभागामार्फत मराठी बांधवांसाठी तिथे संधी उपलब्ध करून देणार आहोत. त्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील या मंडळाचे सभासद होते. एमआयडीसीसाठी जागेचे वाटप (अलॉटमेंट) पारदर्शक होण्यासाठी ‘मिलाप’ नावाचं अँप आणणार आहे. त्यामुळं ज्याला जमीन हवी असेल तर त्याला मोबाइलवरून अर्ज करता येणार. तसेच यामुळे पारदर्शकता येईल. विशेषतः तरुण उद्योजकांना याचा फायदा होईल. विहित नमुन्यात अर्ज केल्यास आठव्या दिवशी त्याला जागा मिळेल. ऑनलाइन अलॉटमेंटलेटर घरी पाठवू, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.